जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -9- महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये दिनांक 1 ऑक्टोंबर, 2022 पासून सहकारी संस्थांच्या निवडणूकांना दिलेली स्थगीती उठविलेली आहे. दिनांक 15 जुलै, 2022 पासून स्थगीत असलेल्या निवडणूकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
ज्या दुग्ध, मत्स्य, शेळी- मेढी व
कुकूटपालन सहकारी (पदूम) संस्था निवडणूकीसाठी पात्र आहेत. त्यांनी जिल्हाचे सहाय्यक
निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक / धुळे – नंदुबार / अहमदनगर/ जळगाव यांचेशी
संपर्क साधावा, असे विभागीय उपनिबधक, सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक विभाग नाशिक
यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment