जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -9- जिल्हयातील उमेदवारांची नाव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरु झालेला आहे. उमेदवार विभागांच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन नाव नोंदणी करीत आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन् नांव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या युझर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो.
याच अनुषंगाने अल्पसंख्यांक
उमेदवारांना देखील रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ मिळणे करीता
जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाईन नाव नोंदणी करणे अपेक्षीत आहे.
कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना देखील नांव नोंदणी करण्यांबाबत मार्गदर्शन व
सहाय्य या कार्यालयाकडून करण्यात येते.
रोजगाराच्या संधी पुरेशा प्रमाणात
उपलब्ध होत नाहीत. या कार्यालयामार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी
वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या ऑन-लाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यात यावा तसेच
अल्पसंख्यांक उमेदवारांनी देखील आयोजीत करण्यात आलेल्या मेळाव्याचा लाभ घेण्याचे
आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र
वि.जा. मुकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वयेक कळविले आहे. याबाबत काही अडचण
असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते सध्या 6.15 या वेळेत
कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, असे
आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्या विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव
यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment