Tuesday, 22 November 2022

गुरुवार 21 रोजी ऑनलाईन स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 22जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्र, जळगाव या कार्यालयामार्फत गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 12 ते 12.30 या वेळेत ऑनलाईन जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे मॉडेल करिअर सेंटर व्दारा, स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

          या मार्गदर्शन सत्रात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राव्दारे मॉडेल करिअर सेंटर व्दारा, कु. सीमा शर्मा, यंग प्रोफेशनल हे  मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन गुगल मिटवर करण्यांत आलेले आहे. गुगल मिट लिंक खालीलप्रमाणे

 गुगल मिट लिंक-meet.google.com/wgv-ddnz-ypf

          तरी जिल्हयातील जास्तीत जास्त युवक / युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन, सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment