Tuesday, 1 November 2022

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ नोव्हेंबर रोजी

                    जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 1 – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 7 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑफलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी सभागृहात  आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.

              जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर, 2022 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात.  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                       ०००००


 

No comments:

Post a Comment