जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 14 – भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंती निमित्ताने जिल्हा प्रशासनामार्फत अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस
माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी
उप जिल्हानिवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविन्द्र भारदे, उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन) श्रीमती शुभांगी भारदे,
तहसिलदार सुरेश थोरात, महसूल सहाय्यक
प्रकाश शेळके, अव्वल कारकून गणेश साळी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील
तसेच विविध कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment