Thursday, 17 November 2022

अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांचा जात वैधता कॅम्प 22 व 23 नोव्हेंबर रोजी

             जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 17  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती   जळगाव मार्फत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील मागासवर्ग (अनु. जमाती वगळून) विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी  प्रस्ताव सादर   करण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात येत आहे.  अनुसूचित जाती, भटक्या  विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणा-या विदयार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते परंतु विदयार्थी समितीकडे वेळेत अर्ज सादर करीत नाहीत. त्यामुळे  विदयार्थी शैक्षणीक तसेच इतर लाभापासून वंचित राहतात. सर्व  विदयार्थ्यांना व महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनती करण्यात येते की सर्व महाविदयालयांनी अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याचे अर्ज आपल्या महाविदयालयात ऑनलाईन फॉर्म भरुन नोडल अधिकारी मार्फत तात्काळ या कार्यालयाकडे सादर करावे.  वेळेत अर्ज न भरल्यास महाविदयालयांना जबाबदार धरण्यात येईल.

            आजपर्यंत या समितीकडून ऑनलाईन वैधता प्रमाणपत्र एकुण 41992 वितरीत करण्यात आलेले आहेत. सदर प्रवर्गातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतली व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विदयार्थ्याचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहीत वेळेत ऑनलाईन भरुन त्याची एक साक्षांकीत प्रत पुरावे जोडून (ऑफलाईन)  पद्धतीने  29 नोव्हेंबर 2022 पर्यत कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव यानी केले आहे.

            दिनांक 22  व 23 नोव्हेंबर, 2022 रोजी दोन दिवसीय त्रुटी पुर्तता कॅम्प आयोजित करण्यात आला असून ज्यांच्या प्रकरणात त्रुटी आहे अशांनी मूळ कागदपत्रांसह जिल्हा जात पडताळणी समिती जळगांव येथे कॅम्पच्या दिवशी हजर राहून त्रुटी पूर्तता करावी.

टिप- ऑनलाईन फॉर्म भरतांना घ्यावयाची काळजी

1) अर्जदाराने ऑनलाईन फॉर्म भरतांना स्वताचा किंवा पालकांचा ई-मेल आयडी व मोबाईल     न. नमूद करावा. कारण वैधता प्रमाणपत्र समितीकडून ऑनलाईन ई-मेलवर पाठविण्यात येते. तसेच त्रुटी असेल तर तेही ई-मेलवर पाठविण्यात येते.

2)ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर 30 दिवसांच्या आत समिती कार्यालयात जमा करावे. 3)ऑनलाईन फॉर्म भरतांना मुळ (Original) कागदपत्रे अपलोड करावी, तसेच ऑनलाईन फॉर्मची हार्ड कॉपी व कागदपत्रे राजपत्रित अधिका-यांची सहीने साक्षांकीत करून कार्यालयात सादर करावी. असे सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव बी.यु.खरे यांनी  एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

 

०००००

No comments:

Post a Comment