जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 4 – मा. भारत निवडणूक आयोगाने दिनांक 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दि.09 नोव्हेंबर 2022 से दि.08 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत.
1 जानेवारी 2023 किया त्या आधी 18 वर्ष पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार
म्हणून नोंदणी करता येईल. याशिवाय एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक
तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची अठरा वर्ष पूर्ण होतील. त्यांना देखील आगाऊ
मतदार नोंदणी अर्ज भरता येणार आहे.
विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने 10 नोव्हेंबर 2022 रोजी
जिल्हाभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार असून या दिवशी जिल्हयातील सर्व
ग्रामपंचायती मधील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत
नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, विवाहानंतर गावात आलेल्या स्त्रिया, गावात
कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल, तसेच
दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, लग्न
होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रिया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळणी केली
जाईल, तसेच दि.19 व 20 नोव्हेंबर आणि 03 व 04 डिसेंबर, 2022 रोजी सर्व मतदान
केंद्रावर विशेष शिबीराचे आयोजन करणेत येईल
याशिवाय महिला आणि दिव्यांग यांच्या नाव
नोंदणीसाठी 12 व 13 नोव्हेंबर रोजी, तर 26 व 27 नोव्हेंबर रोजी तृतीयपंथी नागरीक,
देह व्यवसाय करणान्या महिला आणि घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीचे नागरिक
यांच्या नाव नोंदणीसाठी जिल्हाभरात विशेष शिबिरे घेतली जातील. तसेच महाविद्यालयीन
विद्यार्थी यांचेसाठी देखील दि.09 नोव्हेंबर ते 08 डिसेंबर, 2022 या कालावधीत
विशेष शिवीरांचे व ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.
तरी मतदार नोंदणीसाठी पात्र युवा / नागरीक यांनी मतदार यादीत आपले नाव
नोंदवावे, तसेच प्रत्येक मतदाराने प्रारूप मतदार यादीतील आपले तपशील अचूक आहेत का
याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अमन मित्तल यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment