Friday, 18 November 2022

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनीट्रॅक्टर व उपसाधने पुरविण्याबाबत

 जळगाव जिमाका वृत्त सेवा, दि. 18 - जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनि ट्रॅक्टर व त्याची उपसाधने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत. या योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे असल्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

1)स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत. , 2) बचतगटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असलेल्या आणि गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, किंवा प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बँक खात्यात या योजने अंतर्गत 3 लाख 15 हजार ही रक्कम मिनी टॅक्ट्रर व त्याची उपसाधने खरेदी केल्यानंतर जमा करण्यात येते.

3) मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने  यांच्या खरेदीची कमाल मर्यादा तीन लाख पन्नास हजार इतकी  राहील. नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी कमाल मर्यादा रकमेच्या 10% हिस्सा स्वत:  भरल्या नंतरच ते 90 टक्के अनुदानास पात्र राहील.

४)या योजनेचा लाभ घेण्या करीता  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  सामाजिक न्याय भवन, महाबळ रोड, मायादेवी मंदिरा समोर,  जळगाव यांच्या कार्यालातून प्राप्त करुन परिपूर्ण अर्ज सादर करावे. असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.  

00000

No comments:

Post a Comment