Wednesday, 2 November 2022

राष्ट्रीय युवा पुरस्कार सन 2020-21 करीता नामांकने प्रस्ताव सादर करावेत

        जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 2    संयुक्त सचिव, भारत सरकार, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय , नवी दिल्ली यांनी दिनांक  १७ ऑक्टोंबर, २०२२ रोजीच्या पत्रान्वये राष्ट्रीय युवा पुरस्कार       सन २०२०-२१ या वर्षाकरिता दिनांक १५ ऑक्टोंबर,२०२२ ते ६ नोव्हेंबर, २०२२  या कालावधीत अर्हता धारण करणाऱ्या युवक, युवती व संस्था यांचे नामांकन अर्ज / प्रस्ताव  http;//awards.gov.in  या संकेत स्थळांवर ऑनलाईन पोर्टलवर पाठविण्याबाबत कळविण्यात आले आहे.

          केंद्र शासना मार्फत सन २०२०-२१ या वर्षात राष्ट्रीय युवा पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून त्याबाबतची माहिती वरील नमुद संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यात आलेली आहे.

                     तसेच केंद्र शासनाच्या पत्रात नमुद केल्यानुसार सर्व बाबींचे अवलोकन करुन ज्या युवक युवती व संस्था यांचा राष्ट्रीय युवा पुरस्कार सन २०२०-२१ या वर्षाकरीता नामांकनासाठी अर्ज / प्रस्ताव सादर करावयाचे आहे. त्यांनी प्रथम तो ऑनलाईन पोर्टलवर दिनांक १५ ऑक्टोंबर, २०२०  ते ६ नोव्हेंबर, २०२२ या कालावधीत http;//awards.gov.in   या संकेतस्थळावर भरावयाचा आहे. तसेच ऑनलाईन पोर्टलवर भरलेल्या प्रस्तावाच्या सारख्या दोन प्रती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्याकडे दिलेल्या विहित मुदतीत सादर कराव्यात, सदर प्रती व प्रस्ताव हे या कार्यालयाच्या शिफारशीसह मा. आयुक्त क्रीडा व युवकसेवा संचालनालय, पुणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत.

          वरील सुचने प्रमाणे दिलेल्या विहित मुदतीत राष्ट्रीय युवा पुरस्कार सन २०२०- २१ करीता नामांकन प्रस्ताव पाठवावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment