Wednesday, 2 November 2022

राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर साठी अर्ज सादर करावेत

                    जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. 2  मा. आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत क्रीडा शिक्षकांकरीता राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर शिबीराचे आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी जिल्हयातील १० क्रीडा शिक्षकांची प्रवेश निश्चित करण्यात येणार आहे. सदर १० मास्ट्रर ट्रेनर यांनी प्रशिक्षण शिबीर घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव मार्फत क्रीडा शिक्षकांसाठी आयोजित होणाऱ्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर सन २०२२-२३ च्या आयोजनात प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण दयावयाचे आहे. सदर राज्यस्तर मास्ट्रर ट्रेनर प्रशिक्षण घेवू इच्छिणाऱ्या क्रीडा  शिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव येथे विहित नमुन्यातील अर्ज मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या परवानगीने  व मान्यतेने तात्काळ सादर करावयाचे आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जातून आवश्यक ते निकष लावून १० क्रीडा शिक्षक यांना मा. उपसंचालक, क्रीडा व युवक  सेवा, नाशिक विभाग नाशिक यांच्या मान्यतेने राज्यस्तर मास्ट्रर ट्रेनर प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करुन तात्काळ अर्ज सादर करावे, असे  आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

००००

No comments:

Post a Comment