जळगाव दि. 10 ( जिमाका वृत्तसेवा )- राष्ट्र व राज्य निर्माणमध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग /संख्या राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला प्रोत्याहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा धोरण अंतर्गत युवांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हा युवा पुरस्कार नुसार देण्यात येतात.
सन 2023-24 व 2024-25 या दोन वर्षातील जिल्हा युवा पुरस्कार आपल्या जिल्ह्यातील १ युवक, १ युवती व १ नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येणार आहेत. या जिल्हा युवा पुरस्काराचे स्वरुप युवक/युवती यांना रोख रु. 10,000/- नोंदणीकृत संस्थेस रु. 50,०००/- तसेच गौरवपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.
जिल्हा युवा पुस्कारासाठी युवक/युवती अथवा युवा विकासाचे कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्था यांची 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षामध्ये (म्हणजेच 2023-24 या वर्षीसाठी अर्जाचे मुल्यांकन करताना 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2024 तर 2024-25 या वर्षीसाठी अर्जाचे मुल्यांकन करताना 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील कार्य ग्राह्य धरले जाईल ) केलेल्या कामगिरीचे मुल्याकंन विचारात घेण्यात येणार असून जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 साठी अर्ज दि. 27 मार्च 2025 रोजी पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय किंवा http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक/ युवती व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या नोंदणीकृत संस्था यांनी पुरस्कारासाठी विहीत नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केलेले आहे.
00000000000000
No comments:
Post a Comment