Monday, 3 March 2025

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात 67 अर्ज प्राप्त

  जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा) -  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज दिनांक 3 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता अल्पबचत सभागृह जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता.

            मा. उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे  यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या लोकशाही दिनात एकूण 67 अर्ज प्राप्त झाले. या अर्जाचे निराकरण करण्यासाठी सबंधीत विभागाचे अधिकारी उमा ढेकळे, तहसिलदार       ( संजय गांधी) , नायब तहसिलदार राहुल सोनवणे, (करमणूक शाखा), तसेच इतर अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. 

                                                              ००००००००००

No comments:

Post a Comment