Thursday, 6 March 2025

पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धा जल्लोषात संपन्न; जळगाव जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचा सुत्य उपक्रम

               जळगाव दि. ०६ ( जिमाका ):   महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून पारंपरिक क्रीडा महाकुंभ जळगाव जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय जळगाव डॉ. सुहास गाजरे यांच्या हस्ते व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी  नवनीत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

           या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक चौधरी, पराग पाटील, मनोज महाजन, अंकुश वाशिमकर, उपस्थित होते. स्पर्धेत विविध पारंपरिक खेळांचा समावेश होता आणि विजेत्यांना गौरविण्यात आले.

या स्पर्धा विजेते खालीलप्रमाणे आहेत.

लेझीम स्पर्धाः कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय आयटीआय, जळगाव (मुले)

आदर्श हायटेक अशासकीय आयटीआय, कुऱ्हे पानाचे (मुले)

लंगडी स्पर्धाः कवियित्री बहिणाबाई चौधरी औ.प्र. संस्था, जळगांव (मुली)

दोरी उडी स्पर्धाः  नकुल उत्तम हिवरे, स्वातंत्र सैनिक गोविंदराव वैद्य शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर, सानिया कलिंदर तडवी, महर्षी व्यास शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, यावल नितीन राजू पवार, आदर्श अशासकीय आयटीआय, कुऱ्हे पानाचे,  चहक भारत सिके आदर्श अशासकीय आयटीआय, कुऱ्हे पानाचे

विटी दांडू स्पर्धाः  स्व. हरिभाऊ रामकृष्ण बारी शासकीय आयटीआय, जामनेर (मुले)

पंजा लावणे स्पर्धाः निकिता प्रवीण पाटील, हरी नारायण आपटे शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, पारोळा (मुली), विवेकानंद महिंद्रा बडगुजर, संत सखाराम महाराज शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, अमळनेर (मुले), साहिल शरद वानखेडे - संत गाडगेबाबा आयटीआय, भुसावळ (मुले) दंड बैठक स्पर्धाः गणेश बाविस्कर, तंट्या मामा भिल शासकीय आयटीआय चोपडा (मुले), शितल बाविस्कर, राणी लक्ष्मीबाई शासकीय आयटीआय जळगाव (मुली), देविदास किशोर सोनवणे, राजश्री शाहु औ.प्र. संस्था, बांभोरी

फुगडी स्पर्धाः कवियित्री बहिणाबाई चौधरी औ.प्र. संस्था, जळगाव (संघ) आदर्श हायटेक अशासकीय आयटीआय, कुऱ्हे पानाचे (मुले). खो-खो स्पर्धाः कवियित्री बहिणाबाई चौधरी औ.प. संस्था, जळगाव (संघ) (मुले व मुली)

कबड्डी स्पर्धाः कवियित्री बहिणाबाई चौधरी औ.प्र. संस्था, जळगाव / भुसावळ (मुले), एल. एच. पाटील अशासकीय आयटीआय, वावडदा (मुले)

लगोरी स्पर्धाः संयुक्त विजेते - कवियित्री बहिणाबाई चौधरी औ.प्र. संस्था, जळगाव, व शासकीय आयटीआय, धरणगाव (मुले),शहिद राकेश शिंदे शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ (मुली), अशासकीय संत गाडगेबाबा आयटीआय, भुसावळ (मुले)

रस्सीखेच स्पर्धाः कवियित्री बहिणाबाई चौधरी औ.प्र. संस्था, जळगांव (मुले व मुली), अशासकीय संत गाडगेबाबा आयटीआय, भुसावळ (मुले)

   पावनखिंड दौड : मुलांचा गट 16 ते 19 वयोगटः ओम रविंद्र निवळे,शहिद राकेश शिंदे शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ, दीपराज मावजी पाटील,अशासकीय तात्यासाहेब अरुण बाजीराव चौधरी खाजगी औ.प्र. संस्था, कासोदा

मुलींच्या गटातः 16 ते 19 शहिद राकेश शिंदे शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ खुशबू वैरागड,

19 वर्षे वरीलः मुले सतिष समाधान बनकर कै. हरीभाऊ रामकृष्ण बारी शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर. मयुर प्रमोद महाजन, हिंदी सेवा मंडळ संचलित, संत गाडगेबाबा खाजगी औ.प्र. संस्था भुसावळ. 19 वर्षे वरील मुलींमध्ये आचक दिवाकर माळवनकर,शहिद राकेश शिंदे शासकीय औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ.

            सर्व विजयी वि‌द्यार्थी व वि‌द्यार्थिनी दिनांक 8 व 9 मार्च रोजी नाशिक येथे विभाग स्तरीय स्पर्धेसाठी जाणार आहेत.  स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयटीआय जळगाव येथील सर्व गटनिर्देशक, शिल्प निर्देशक, कार्यालयीन कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश सपकाळ यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

०००००००००००

 

No comments:

Post a Comment