जळगाव, दि. 3 जुलै (जिमाका वृत्तसेवा): - केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचा दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.
आज सायंकाळी ७.५५ वाजता त्या मुंबई विमान तळावरून
जळगावकडे प्रयाण करतील. ८.२५ वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल. ८.४५ वाजता रस्तेमार्गे मुक्ताईनगरकडे प्रयाण
करतील व रात्री मुक्कामी.
शनिवारी, ५
जुलै रोजी चोरवड (भुसावळ) येथे सकाळी १० ते १२ या वेळेत “MY भारत” आणि NSS यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित “एक
झाड – आईच्या नावाने”
या वृक्षारोपण उपक्रमात सहभागी होतील.
यानंतर
दुपारी १.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर “पंढरपूर स्पेशल ट्रेन”च्या ध्वजवंदन
समारंभात त्या उपस्थित राहतील.. सायंकाळी ५ वाजता भुसावळहून रस्ते मार्गे छत्रपती
संभाजीनगरकडे प्रस्थान करतील व रात्री ८ वाजता आगमन.
0000000000
No comments:
Post a Comment