जळगाव, दि. ३ जुलै (जिमाका वृत्तसेवा) – राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे मंजूर लाभार्थ्यांना डिसेंबर २०२४ पासून थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यावर लाभ वितरीत करण्यात येत आहे.
तथापि,
अद्याप काही लाभार्थ्यांनी आधार अद्ययावत करणे व केवायसी पूर्ण करणे बाकी
असल्यामुळे अशा लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अशा
पात्र लाभार्थ्यांनी त्वरित नजीकच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड
अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार, भुसावळ यांनी केले आहे.
याशिवाय,
या दोन्ही योजनांसाठी बँकेत खाते असलेल्या लाभार्थ्यांनी संबंधित बँकेत जाऊन आधार
आधारित केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तहसीलदार भुसावळ यांनी
प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
0000000000
No comments:
Post a Comment