Thursday, 17 July 2025

आदिवासी उमेदवारांसाठी प्लेसमेंट ड्राइव्ह – २२ जुलै रोजी रावेर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

             जळगाव, दि. १७ (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता प्लेसमेंट ड्राइव्ह (जागेवर निवड संधी) स्वरूपातील विशेष रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा आदिवासी उमेदवारांकरीता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शनि मंदिरामागे, रावेर, जि. जळगाव येथे पार पडणार आहे.

            या विशेष रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील नामांकित खाजगी आस्थापना व उद्योजक कंपन्यांचा सहभाग राहणार असून विविध क्षेत्रांतील पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.

            खाजगी आस्थापना व कंपन्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home या संकेतस्थळावरील Employer विभागात लॉगिन करून आपल्या युजर आयडी व पासवर्डचा वापर करून पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ऑफलाइन प्लेसमेंट ड्राईव्ह क्र. ०३ – जळगाव या टॅबमध्ये रिक्त पदांची नोंद करावी. नव्याने सहभागी होणाऱ्या आस्थापनांनी संकेतस्थळावर प्रथम नोंदणी करून रिक्त पदांची माहिती अपलोड करावी.

 

            नोकरी इच्छुक आदिवासी उमेदवारांनी दि. २२ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता वरील ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

            यासंदर्भात अधिक माहितीसाठी किंवा अडचण असल्यास इच्छुकांनी दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ६.१५ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. संदीप ज्ञा. गायकवाड (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव) यांनी केले आहे.

00000000000

No comments:

Post a Comment