जळगाव दि – 08 ( जिमाका ) : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत योजनेअंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षावरील जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना २०२५” अंतर्गत जिल्ह्यातील गरजू व ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांसाठी या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹5,000 इतके मानधन देण्यात येणार आहे.
या
योजनेसाठी 50 वर्षांहून अधिक वय
असलेले साहित्यिक, लेखक, कलावंत, वाचनसंस्था कार्यकर्ते, वादक, गायक, चित्रकार
इत्यादींनी अर्ज करावा. दिव्यांगाना वयाची अट १० वर्षनि शिथिल करण्यात आली आहे. अर्जदारांनी कोणत्याही शासन सेवेत नोकरीस
नसावे, तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न ₹60,000 पेक्षा अधिक नसावे. ज्या कलाकारांची उपजिविका फक्त
कलेवरचं अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र
सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गान उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य
शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भुत नसलेले
पात्र कलाकार , कलाकार साहित्यिक
महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. अशा पात्र कलाकारांना योजनेचा लाभ
घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर दिनांक १ जुलै २०२५ ते ३१ जुलै
२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
अर्ज
करण्यासाठी वयाचा दाखला , आधारकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला ,
प्रतिज्ञापत्र ,पासपोर्ट साईझ फोटो, बँक पासबुक, अपंग दाखला (असल्यास),
राज्य/केंद्र शासनाचे पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारस
पत्र, विविध पुरावे (छायाचित्रांसह) ही
कागदपत्र आवश्यक आहे.
कलावंत किंवा साहित्यिकांनी अर्ज
भरताना ‘महा-ई-सेवा’ केंद्रामार्फत किंवा मोबाईलद्वारे महा सरकार पोर्टलवर User ID
तयार करून अर्ज भरता येईल, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)
भा.शि. अकलाडे यांनी केले आहे.
00000000000
No comments:
Post a Comment