Tuesday, 15 July 2025

जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रारूप प्रभाग रचना नकाशे प्रसिध्द !

         जळगाव, दि. 15  (जिमाका)- दिनांक १४ जुलै २०२५  - रोजी जळगाव जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सर्व १५ पंचायत समित्यांच्या निवडणूक विभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

 ही रचना महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचना दिनांक १२ जून २०२५ नुसार करण्यात आली असून

 जिल्हा परिषद निवडणूक विभागांची संख्या व व्याप्ती

 पंचायत समित्यांचे निर्वाचक गण व त्याची व्याप्ती

हे दोन्ही मसुदे राजपत्रात प्रकाशित करण्यात आले आहेत.

 हरकती व सूचना नागरिकांनी २१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव किंवा आपल्या तहसील कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात.

 २१ जुलै नंतर प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

✅ ही रचना पुढील सार्वत्रिक निवडणुकीसाठी लागू राहणार असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर व मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पाडली जात आहे.

 सहज-सुलभ समजून येण्यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधींना लक्षात येईल अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्यातील नकाशे देखील प्रसिद्ध केले जात आहेत.

अधिक माहितीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.                      ००००००००००००००

 

No comments:

Post a Comment