जळगाव, दि.2 - संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत अकार्यरत धर्मादाय संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही 1 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे अकार्यरत संस्थांच्या विश्वस्तांनी त्यांच्या संस्थेचे प्रलंबित हिशोबपत्रके व फेरफार अर्ज तातडीने दाखल करावे. अन्यथा अशा संस्थेची नोंदणी मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त, जळगाव यांचेमार्फत महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 (3) अ अंतर्गत स्वयंखुद्द चौकशी करुन रद्द करण्यात येईल. अशी माहिती सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे अधिक्षक टी. डी. तायडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अकार्यरत संस्थांची यादी तयार करण्यात आलेली असून ही यादी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, जळगाव येथील नोटीस बोर्डावर 1 नोव्हेंबर 2017 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे तसेच ही यादी मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाच्या www.charity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अकार्यरत संस्थेच्या यादीमध्ये ज्या संस्थांनी संस्था नोंदणी झाल्यानंतर किंवा मागील 5 वर्षापासून आजपावेतो त्यांची वार्षिक हिशोबपत्रके किंवा विश्वस्त मधील बदल घटनेच्या तरतुदीनुसार त्या संस्थेच्या मालमत्तेबाबतीत व इतर झालेल्या बदलांबाबत फेरफार अर्ज दाखल केलेले नाहीत. अशा संस्थांचा अकार्यरत संस्था म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. संबंधित संस्थांच्या विश्वस्थांनी त्यांच्या संस्थेचा समावेश अकार्यरत संस्थेच्या यादीमध्ये असेल तर त्यांनी यादी प्रसिध्द झाल्यापासून 30 दिवसाच्या आत प्रलंबीत हिशोबपत्रके व फेरफार अर्ज दाखल करावेत.
०००००

No comments:
Post a Comment