जिमाका-जळगाव,
दि.21:- ‘ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र’ अंतर्गत महाराष्ट्र सायबरच्यावतीने
माध्यम प्रतिनिधींसाठी सायबर सुरक्षेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
येत आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक, कार्यालयातील सायबर
सेल व जिल्हा माहिती कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या
प्रतिनिधींसाठी मंगळवार 23 जानेवारी, 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता प्रेरणा हॉल,
पोलीस अधिक्षक कार्यालय, जळगाव येथे सायबर जाणीवजागृती विषयक कार्यशाळा आयोजित
केली आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस
अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेस अपर पोलीस
अधिक्षक बच्चन सिंह, पोलीस उप अधिक्षक रशीद तडवी, सचिन सांगळे आदि मान्यवर उपस्थित
राहून मार्गदर्शन करणार आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या
प्रतिनिधीं आणि जनसंज्ञापन व मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने
उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके व स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरिक्षक सुनील कुऱ्हाडे यांनी केले आहे.
000




No comments:
Post a Comment