Friday, 5 January 2018

प्रलंबित शिष्यवृत्तीचे ऑनलाईन स्टेटमेंट 31 जानेवारीपर्यंत प्रकल्प कार्यालयास सादर करण्याचे आवाहन



        जिमाका-जळगाव, दि. 5:- आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2017-18 करीता भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, योजनांचे अर्ज पुर्वीचे (ई-स्कॉलरशिप) https://etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावेत.
            जिल्ह्यातील प्राचार्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेल्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे चालु शैक्षणिक वर्ष 201-17 तसेच सन 2012-13 पासूनचे प्रलंबित शिष्यवृत्तीचे ऑनलाईन बी स्टेटमेंट प्रमाणित करुन 31 जानेवारी 2018 पर्यंत प्रकल्प कार्यालयास सादर करावेत.
            भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी शिष्यवृत्ती पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढून बँकखात्यात आधारसंलग्न करावे. यासंबंधी प्राचार्य यांनी महाविद्यालयाच्या नोटीसबोर्डवर सुचना लावण्याचे आवाहन आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment