जिमाका-जळगाव, दि.17:- शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक यांच्यामार्फत जिल्ह्यातील सुशिक्षित आदिवासी बेरोजगारांना स्वंयरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे.या कर्जदारांनी त्यांचेकडील कर्जाची परतफेड नियमितपणे करुन महामंडळास सहकार्य करावे. असे आवाहन व्ही.पी. घोंगडे, शाखा व्यवस्थापक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा यावल यानी केले आहे.
शबरी
महामंडळाच्या लाभार्थ्यांना अल्प व्याजदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी कर्जाची नियमित
परतफेड करणे आवश्यक आहे. परंतु लाभार्थ्यांनी त्यांचेकडील कर्जाची नियमित परतफेड
केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी दिसून
येत आहे. शबरी आदिवासी महामंडळास राज्य शासनाची हमी मिळाल्यानंतरच एनएसटीएफडीसी,
नवी दिल्ली यांच्याकडून नवीन कर्जासाठी निधी मिळणार आहे. त्यामुळे शबरी
महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेल्या आदिवासी बांधवानी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड
करुन महामंडळास सहकार्य करावे. असे आवाहनश्री. व्ही. पी. घोंगडे, शाखा
व्यवस्थापक यांनी एका
प्रसिध्दीपत्रकान्व्ये केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment