जळगाव, (जिमाका) दि. 20 - कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर वाढलेला असून दिवसेदिवस नवीन रुग्णाची
त्यामध्ये भर पडत आहे. अर्सेनिक अल्बम -30 या औषधामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
त्यामुळे विविध स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांनी दिलेल्या मदतीमधुन
Containment Zone मधील कुटूंबाना मोफत अर्सेनिक अल्बम -30 या औषधांचा पुरवठा
स्वयंसेवकामार्फत करण्यात येणार आहे. सदर औषधाचे वाटप करणे तसेच Containment Zone
मध्ये जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे इत्यादी कामे स्वयंसेवकांमार्फत यापुढील
कालावधीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
स्वयंसेवकांची
निवड याप्रमाणे - स्वयंसेवक हा Containment Zone मधील रहिवाशी असावा, स्वयंसेवक हा
स्वयंस्फुर्तीने काम करण्यास तयार असावा, त्याचे वय सर्वसाधारणपणे 25 ते 40 वर्षे
या वयोगटातील असावा. त्याला कोणताही आजार नसावा, सर्वसधारणपणे 50 कुटूंबासाठी एक
स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. कुटूंबाची
यादी तयार करतांना सलग घरे असलेली कुटूंब घेण्यात येणार आहे. या कुटूंबाशी परिचीत
असलेली व्यक्तीच स्वयंसेवक म्हणून घेण्यात येणार आहे. स्वयंसेवक म्हणून काम
करणाऱ्या व्यक्तींनी कंटेन्मेंट झोन अधिकारी यांचेशी अथवा तहसिलदार यांचेशी संपर्क
साधावा.
अर्सेनिक
अल्बम -30 या औषधाचे जिल्हाधिकारी कार्यालयातुन तहसिलदार यांना 50-50 डब्यांचे
बंडल करुन दिले जातील. तहसिलदार हे त्याचदिवशी सदरची औषधे Containment Zone मधील
कुटूंबांची संख्या विचारात घेवून Containment Zone Officer यांचेकडे देतील. Containment Zone Officer हे प्रत्येक स्वयंसेवकास 50 बॉटल्स
देतील. स्वयंसेवक त्यांचेकडे असलेल्या 50 कुटूंबियांना वाटप करतील. स्वयंसेवकांनी
औषधांचे वाटप सुरु करण्यापुर्वी Sanitizer ने हात स्वच्छ धुवायचे असुन Mask
घातल्याशिवाय कोणीही औषधांचे वाटप करावयाचे नाही, औषध वाटप करताना Social
Distancing चे पालन होईल याची दक्षता स्वयंसेवकांनी घ्यावी लागणार आहे.औषधाचे सेवन
कसे करायचे याचे Video ते Containment Zone Officer यांचेमार्फत स्वयंसेवकांना देण्यात
येणार आहे. स्वयंसेवकांनी ते त्यांचेकडे असलेल्या 50 कुटूंबांचे मोबाईलवर पाठवायचे
आहेत. औषधाचे वाटप सुरु करण्यापुर्वी हे व्हिडिओ सर्व कुटुंबाना पाठविले गेले
आहेत. यांची खात्री Containment Zone
Officer करणार आहे.
औषधाचे वाटप सुरळीतपणे कोणतीही गडबड न होता
आणि Social Distancing चे पालन करुन होईल
याची दक्षता Containment Zone Officer आणि स्वयंसेवकांनी घ्यावयाची आहे. असे
अध्यक्ष, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती तथा परिस्थिती नियंत्रक जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment