जळगाव,
दि. 19 (जिमाका) - पणन महासंघाचे प्रधान सचिव व संचालक यांच्याकडून प्राप्त
झालेल्या सुचनांनुसार शेतकऱ्यांडील कापूस खरेदी करण्याबाबत भारतीय कापूस महामंडळ,
लि. व महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ यांना कळविण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतमाल विक्री
करण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन पणन महासंघाकडून करण्यात आले होते. त्यानुसार
आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यातील 37020 शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील 12 कृषि उत्पन्न बाजार समितीकडे
कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेली असून आतापर्यंत 3 हजार 334 शेतकऱ्यांना टोकन
देण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
नोंदणी
केलेल्या शेतकऱ्यांची तालुकानिहाय, बाजार समितीनिहाय संख्या तसेच टोकन दिलेल्या
शेतकऱ्यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे .
जळगाव
तालुका-शेतकरी संख्या-2230(180),चाळीसगाव-शेतकरी संख्या-2403, भुसावळ-शेतकरी
संख्या-1175 (170), मुक्ताईनगर- बोदवड-शेतकरी संख्या-3367 (184), जामनेर-शेतकरी
संख्या-7 हजार (150), पाचोरा-भडगाव-शेतकरी संख्या-3500, (60), एरंडोल-धरणगाव-
शेतकरी संख्या-5275 (980), पारोळा-शेतकरी संख्या-7200 (1463), अमळनेर-शेतकरी
संख्या-2650, रावेर-शेतकरी संख्या-552, चोपडा-शेतकरी संख्या-1668 (147),
अशाप्रकारे जिल्ह्यातील एकूण 11 बाजार समित्यांमध्ये 37 हजार 20 शेतकऱ्यांनी
नोंदणी केली असून त्यापैकी 3 हजार 334
शेतकऱ्यांना टोकनही देण्यात आले आहे.
महाराष्ट्र
राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. विभागीय कार्यालय, जळगाव यांनी
वेळोवेळी केलेल्या विनंतीनुसार जिल्ह्यात पणन महासंघाचे धरणगाव, कासोदा, (एरंडोल)
अमळनेर, पारोळा, दळवेल (पारोळा) भडगाव असे एकूण 6 केंद्र असून या केंद्रामध्ये
एकूण 9 जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये कापूस खरेदी केंद्र नियोजित आहेत.
सद्यस्थितीत
पणन महासंघाचे धरणगाव कासोदा (एरंडोल) व पारोळा या केंद्रावरील 7 जिनिंग प्रेसिंग
फॅक्टरीमध्ये कापूस खरेदी खरेदी केंद्र असून या केंद्रांवर महाराष्ट्र राज्य
सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे आवक झालेल्या कापसाची प्रतवारी निश्चित
करण्यावसाठी प्रत्येक केंद्रावर एक प्रतवारीकार (ग्रेडर) उपलब्ध आहेत.
सद्यस्थित
कापसाची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रेडरची संख्या वाढवून मिळण्यासाठी
प्रयत्न सुरु आहे. कापुस खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण व
मार्गदर्शानासाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी त्यांच्या अधिनिस्त
अधिकाऱ्यांची/कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे.
अधिकारी/कर्मचारी
यांचे नाव ,पद,त्यांचे कार्यालय व त्यांचा भ्रमणध्वनी पुढील प्रमाणे आहे. प्रशांत
विठ्ठल देसाई-मंडळ कृषि अधिकारी-तालुका कृषी कार्यालय-चोपडा-7588614168, दिपक
भास्कर साळुंखे-मंडळ कृषी अधिकारी-तालुका कृषी कार्यालय-अमळनेर-9421690414, धनंजय
साहेबराव पोळ-मंडळ कृषी अधिकारी-तालुका कृषी कार्यालय-भुसावळ-8055250250, शरद शंकर
पाटील-कृषी पर्यवेक्षक-तालुका कृषी अधिकारी कार्यालय,जळगाव-9420788384 असा आहे.
शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास किंवा मार्गदर्शन हवे असल्यास या अधिकारी
/कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment