जळगाव, दि.28 (जिमाका) - राष्ट्रीय अन्न सुरक्षा
योजनेत अथवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या बिगर शिधापत्रिकाधारकांना
माहे मे व जुन 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रती व्यक्ती 5 किलो मोफत
तांदुळ देण्यात येणार आहे.
बिगर
शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदुळ वितरणाकरीता मजुरांच्या स्थलांतरासाठी केलेल्या
नियोजनामधुन कामगार/मजुर इ. बिगर कार्डधारकांची स्थानिक यंत्रणा तसेच संबंधीत
गावाचे तलाठी/ग्रामसेवक यांच्याकडे आधारकार्डासह सदस्यांची नावे द्यावी. तसेच शहरी
भागातील मनपा हद्दीतील बिगर शिधापत्रिकाधारकांनी तहसिल कार्यालय आवारातील सेतू
सुविधा केंद्रात 1 जुन, 2020 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 4 यावेळेत नाव नोंदणी
करावी. असे तहसिलदार जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment