Tuesday, 26 May 2020

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम महत्वाचे


            जळगाव.दि.26 (जिमाका) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणित वाढतच आहे. कोरोना विषाणूचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्राणायाम, योगासने अशा प्रकारचे व्यायाम करून आपली रोग प्रतिकार शक्ती वाढविल्यास आपण कोरोना विषाणूच्या प्रभावापासून आपला बचाव करू शकतो. आतापर्यंत जवळपास 75 टक्के कोरोना बाधित रुग्णांना प्राणायाम आणि विविध प्रकारच्या व्यायामामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ति चांगली असल्याने त्यांना 10 दिवसात पुर्णपणे बरे होवून घरी सोडण्यात आले.
            कोरोना विषाणूचा प्रभावापासून दुर राहण्यासाठी प्रामुख्याने प्रत्येकाने दररोज किमान अर्धा तास विविध प्रकारचे व्यायाम करणे, आजारी व्यक्तींनी वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने शिफारस केलेला काढा घेणे, सकस आहार, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी चा आहारात समावेश असावा, भरपूर पाणी प्यावे, थंड पदार्थ टाळावेत असे आवाहन अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समिती, जळगाव तथा परिस्थिती नियंत्रक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव गोरक्ष गाडीलकर यांनी जनहितार्थ प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
****

No comments:

Post a Comment