Thursday, 21 May 2020

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन


            जळगाव, (जिमाका) दि. 21 - माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
            दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, विशेष भूसंपादन अधिकारी किरण सावंत-पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, नायब तहसिलदार रविंद्र मोरे, यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.
00000

No comments:

Post a Comment