जळगाव,
दि. 15 (जिमाका) - जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी
जिल्हा नोडल अधिकारी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. तर
तालुकास्तरीय कोविड-19 केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी नोडल
अधिकारी म्हणून उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक यांना नियुक्त करण्यात येत
आहे.
जिल्हास्तरीय कोव्हिड-19 केअर
सेंटरसाठी नियुक्त नोडल अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांचेवर
तालुकास्तरावर आवश्यक ती वैद्यकीय सुविधा, तांत्रीक मनुष्यबळ, आवश्यक औषधीसाठा,
आवश्यक साधनसामग्री, आवश्यक उपकरणे, रुग्ण्वाहिका, शववाहिका इत्यादि सुविधा उपलब्ध
करून देण्याबाबतचे नियंत्रण करणे तसेच अधिनिस्त असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील
सर्व वैद्यकीय अधिक्षक यांचेवर संनियंत्रण, पर्यवेक्षण करणे, कोविड हेल्थ सेंटर
मधील बायोमेडीकल वेस्टची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे, आवश्यक कर्मचारी, अधिकारी
यांचे नियुक्तीचे आदेश देणे तसेच संबंधित कर्मचारी, अधिकारी यांचा ड्युटी चार्ट
तयार करून योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे, कोविड योध्दांची नेमणूक करणे, दैनंदिन
अहवाल संकलन करणे, एकत्रित करणे व राज्यस्तरावर सादर करणे. गामीण भागातील
पॉझिटिव्ह केसेसची एकत्रीत यादी, मयत रुग्णांचे मॉरटेलीटी फॉर्म, सीआयएफ फॉर्म,
कॉन्टेंक्ट ट्रेसीग फॉर्म त्वरीत कॉन्ट्रक्ट ट्रेसींग नोडल अधिकारी यांना उपलब्ध
करून देणे.
तर तालुकास्तरावर कोविड सेंटर व
डेडिकेटेड हेल्थ सेंटरसाठी नियुक्त नोडल अधिकारी ग्रामीण रुग्णालयांचे /उपजिल्हा
रुग्णालयांतील वैद्यकीय अधिक्षक यांनी तालुकास्तरीय कोव्हिड हॉस्पिटल च्या
कामाकाजाचे संनियंत्रण करणे, सकाळी व संध्याकाळी प्रत्यक्ष रुग्णांना भेट देणे
त्यांना मिळणाऱ्या औषधोपचार व इतर सोईबाबत येणाऱ्या अडीअडचणी दुर करणे व तसा
दैनंदिन अहवाल जिल्हा नोडल अधिकारी यांना सादर करणे, कोविड सेंटरमधील संशयीत
रुग्णांचे स्वॅब घेणे, तपासणी साठी पाठविणे तसेच दैनंदिन अहवाल तपासणी यादी
दैनंदिन जिल्हा नोडल अधिकारी यांना उपलब्ध करून देणे. अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या
त्यांच्यावर सोपविल्या आहेत.
कार्यकारी अभियंता सार्वजनिक
बांधकाम विभाग यांनी कोरोना हेल्थ सेंटरसाठी आवश्यक पलंग, गाद्या, किरकोळ दुरूस्ती,
पाणीपुरवठा, वीजपुरवठा इत्यादि कामांची आवश्यक ती परवानगी कार्यकारी अभियंता
यांचेकडून घेवून पुर्ण करावेत. सर्व संबंधित नियुक्त अधिकाऱ्यांनी आदेशाचे तात्काळ
अंमलबजावणी करून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जबाबदारीनुसार आवश्यक
कार्यवाही करावी. असे आदेश अध्यक्ष, जात पडताळणी समिती, जळगाव तथा प्रसंग
नियंत्रक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव गोरक्ष गाडीलकर यांनी एका
आदेशान्वये निर्गमित केले आहे.
000000
No comments:
Post a Comment