जळगाव,
(जिमाका वृत्तसेवा) दि. 4 - कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या मदत आणि
सहाय्यतेसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, शाखा जळगाव यांना डॉ. अविनाश ढाकणे,
जिल्हाधिकारी जळगाव यांचे निर्देशानुसार भारतीय खाद्य निगम यांचेकडून शासनाच्या
Open Market Sales Scheme अंतर्गत नुकताच एक मेट्रीक टन तांदूळ सवलतीच्या दरात
उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
कोरोना विषाणु संसर्गामुळे लॉकडाऊन
कालावधीत निवारागृह आणि अन्न व्यवस्थेबाबत करावयाच्या तातडीच्या उपाययोजनेनुसार
भारतीय खाद्य निगम यांच्य Open Market Sales Scheme (OMSS) अंतर्गत कम्युनिटी किचन भोजन व्यवस्था करणेसाठी सवलतीच्या दरात
भारतीय खाद्य निगमकडून गहू आणि तांदूळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी
कम्युनिटी किचन अंतर्गत कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था, धर्मदाय संस्था यांनी
जिल्हाधिकारी यांचेकडेस विहित प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. असा प्रस्ताव
प्राप्त झाल्यावर सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचे शिफारशीसह भारतीय खाद्य निगमकडे
पाठवला जातो. प्रस्ताव खाद्य निगम यांचेकडून मान्य झाल्यावर संबंधित संस्थेने
निगमच्या बँक खात्यात आवश्यक खरेदीची रक्कम जमा केल्यावर संबंधित संस्थेच्या
नावाने वितरण आदेश निर्गमित करण्यात येतात. त्यानुसार अर्जदार संस्था
त्यांचे जिल्ह्यातील खाद्य निगमच्या डेपोतून धान्य उचल करते. सद्यस्थितीत अशा
संस्थांसाठी गहू 21 हजार रुपये प्रति मे. टन आणि तांदूळ 22 हजार रुपये प्रति मे.
टन असे सवलतीचे दर भारतीय खाद्य निगमकडून निश्चित करण्यात आले आहे. सवलतीच्या
दरातील गहू आणि तांदूळ कमीत कमी एक मे. टन खरेदी करणे आवश्यक असुन जास्तीत जास्त
खरेदीसाठी मर्यादा नाहीत.
भारतीय खाद्य निगमच्या या स्कीममध्ये
समावेश होऊन अन्नाधान्य सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देणेबाबत प्रस्ताव इंडियन
रेडक्रॉस सोसायटी, शाखा जळगाव यांनी नुकताच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
यांचेकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी संस्थेच्या विनंतीची
तात्काळ दखल घेऊन भारतीय खाद्य निगम,
मनमाड यांना सवलतीच्या दराने एक मे. टन तांदूळ उपलब्ध करुन देणेबाबत शिफारस केली
होती. भारतीय खाद्य निगम, मनमाड येथील अधिका-यांनी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या
शिफारशीनुसार तात्काळ कार्यवाही करुन संस्थेस आवश्यक रक्कम ऑनलाईन स्वरुपात शासन
जमा करणेबाबत सुचित केले होते. संस्थेने
आवश्यक रक्कम खाद्य निगमच्या खात्यात जमा केल्यावर संस्थेस धान्य वितरण आदेश देणेत
आले आहेत. इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांना जळगाव येथील MSWC गोदामातून एक मे. टन
तांदूळ उपलब्ध करुन देणेत येत आहे.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर मदत आणि सहाय्यतेसाठी ज्या संस्थांना भारतीय खाद्य निगमच्या OMSS
अंतर्गत सवलतीच्या दराने अन्नधान्य हवे असल्यास संस्थांनी जिल्हाधिकारी
कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा. प्रस्तावात संस्थेचे नाव, कार्य, संपर्क
क्रमांक, ईमेल आयडी तसेच संस्थेस कोणत्या बाबींसाठी सवलतीच्या दराने अन्नधान्य
हवे, किती हवे आहे. संस्थेस सवलतीच्या दराने मान्यता मिळाल्यास संस्था खाद्य
निगमकडे विहित आवश्यक खरेदी मुल्य भरणेस तयार असलेबाबतचा उल्लेख इ. बाबत माहिती
संस्थेच्या लेटर पॅडवर सादर करावी.
संस्थेने
सादर केलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रस्ताव शिफारशीसह भारतीय
खाद्य निगम यांचेकडे साद करणेत येतो. खाद्य निगम यांचेकडून प्रस्तावास मान्यता
देणेत आल्यावर संबंधित संस्थेस विहित खरेदी मुल्य ऑनलाईन भरणा करणेबाबत सुचित
करणेत येते. भरणा झाल्यावर संस्थेच्या नावाने त्वरीत धान्य वितरण आदेश देणेत
येतात. जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, धर्मदाय संस्था यांनी शासनाच्या या योजनेचा
लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment