Friday, 1 January 2021

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 4 जानेवारी रोजी आयोजन

             जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या सोमवारी म्हणजेच 4 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे लोकशाही दिनाअंतर्गत तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत.  लोकशाही दिनात आपल्या तक्रारी विहित नमुन्यात दाखल कराव्यात, असे आवाहन तहसीलदार नामदेव पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

००००

No comments:

Post a Comment