जळगाव, दि. 27 - सारथी विषयक सेवांकरीता ई-साईन सुरु करण्यात आली असून ई-स्वाक्षरी सेवेचा लाभ घेणे हे अर्जदारास ऐच्छिक असून प्रत्येक अर्जाकरीता रु 2/- + जीएसटी असे शुल्क आकारण्यात येणार आहे. अनुज्ञप्ती विषयक अर्ज व त्यासोबत जोडावयाचे सर्व कागदपत्रे ई- स्वाक्षरी करता येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी दिली आहे.
अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरावा, कागदपत्रे अपलोड करावयाच्या आधी अर्जदाराने सर्व कागदपत्रे ई- स्वाक्षरी चा पर्याय निवडावा. पर्याय निवडल्यानंतर अर्ज व त्यासोबत जोडण्यात आलेले सर्व कागदपत्रे आधार क्रमांकाचा वापर करुनच ओटीपी आधारे ई- स्वाक्षरी करण्यात यावी. यानंतर अर्जदाराने ऑनलाईन पेमेंट करावे व आवश्यकतेनुसार अपॉईटमेंट घ्यावी. ज्या प्रकरणांमध्ये अर्जदाराने ई- स्वाक्षरी चा वापर करुन अर्ज दाखल केला असेल त्या प्रकरणांमध्ये अर्जदारास कार्यालयात अर्ज व त्यासोबतची कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. या प्रकरणांमध्ये अर्जदारास अनुज्ञप्ती प्राधिकारीसमोर अनुज्ञप्ती चाचणी देण्याकरीता यावे लागणार आहे. अर्जदाराने ई- स्वाक्षरी केल्यानंतरही त्यास अनुज्ञप्ती चाचणीकरीता कार्यालयामध्ये यावे लागणार आहे.
ई- स्वाक्षरी प्रणालीमुळे अर्जदारास पुन्हा कार्यालयात कागदपत्रे साक्षांकित करुन सादर करण्याची आवश्यक राहणार नाही. तसेच त्यामुळे नागरीकांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन श्री. लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment