जळगाव. दि. 25 - राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.
मंगळवार, दिनांक 26 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 7 वा. 15 मि. नी पाळधी, ता. धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण, सकाळी 7 वा. 30 मि. नी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन, सकाळी 7 वा 30 मि.नी ते 9 वाजेपर्यंत राखीव, सकाळी 9 वा. 08 मि. नी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून पोलीस कवायत मैदान, जळगावकडे प्रयाण. सकाळी 9 वा 13 मि. नी पोलीस कवायत मैदान जळगाव येथे आगमन, सकाळी 9 वा. 15 मि. नी ध्वजारोहण व राष्ट्रगीत. सकाळी 9 वा.17 मि. ते 9 वा 27 वाजेपर्यंत शुभेच्छापर भाषण, सकाळी 9 वा 27 मि. नी ते 9 वा 31 वाजेपर्यंत स्वातंत्र्यसैनिक व नागरीक यांना शुभेच्छा भेट, सकाळी 9 वा 31 मि.नी ते 9 वा. 45 वाजेपर्यंत चहापान. सकाळी 9 वा 45 मिनी ते 10 वा 15 वाजे पर्यंत मंगलम सभागृह, पोलिस मुख्यालय, जळगाव येथे बक्षिस वितरण समारंभास उपस्थिती, सकाळी 10 वा 15 मि.नी पोलीस मुख्यालय, येथून जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण. सकाळी 10 वा 20 मि.नी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन व जीवन गौरव व मुक नायक पुरस्कार वितरण सोहळयास उपस्थिती व सौर कृषी पंप लाभार्थ्यांना डिमांड नोट वितरण. सोईनुसार पाळधीकडे प्रयाण, दुपारी 4 वाजेपर्यंत राखीव.
दुपारी 4 वाजता पाळधी ता. धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण. दुपारी 4 वा 15 मि.नी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन, सायं 5 वाजता हॉटेल कमल पॅराडाईज जळगाव येथे दर्पण गौरव साप्ताहिकाचे प्रकाशन, सायं 6 वाजता नशिराबाद येथे झी एम न्यूज वर्धापन दिन व सांस्कृतिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं 6 वा. 15 मि.नी नशिराबाद येथून भुसावळ कडे प्रयाण, सायं 7 वाजता शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन समारंभास उपस्थिती, रात्री 8 वाजता भुसावळ येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाकडे प्रयाण, रात्री 11 वा. 30 मि.नी जळगाव येथून गाडी क्र. 02112 अमरावती एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
0000
No comments:
Post a Comment