Wednesday, 20 January 2021

जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत अर्जदारांनी सावधानता बाळगण्याचे समितीचे आवाहन

            जळगाव, (जिमाका) दि. 20 - जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात जात वैधता प्रमाणपत्र मिळणेकामी मोठया प्रमाणात अर्जदार येत असतात. त्याअनुषंगाने गर्दीचा फायदा घेवून तसेच अर्जदारांची तातडीची गरज लक्षात घेऊन बाहेरील काही व्यक्ती अर्जदारांना वैधता प्रमाणपत्र त्वरीत मिळवून देण्याचे अमिष दाखवितात.

            त्याअनुषंगाने समितीच्यावतीने सर्व मागासवर्गीय अर्जदार/पालक यांना आवाहन करण्यात येते की, अशा लोकांपासून अर्जदार/पालक यांनी सावधानता बाळगावी. तसेच ही बाब कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावी. शिवाय, अर्जदार अशा व्यक्तींविरुध्द पोलिसातही तक्रार दाखल करुन शकतात. असे वैशाली हिंगे, उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment