जळगाव, (जिमाका) दि. 20 - कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यात आरोग्य विभागातील 521 आरोग्य सेवकांनी कोरोनाची लस घेतल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात शनिवारी कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर आज तिसऱ्या सत्रात जिल्ह्यात सात लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 100 याप्रमाणे जिल्ह्यातील 700 आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन आरोग्य यंत्रणेने केले होते. त्यानुसार आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे 100, महापालिकेच्या डी. बी. जैन हॉस्पीटलमध्ये 100, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा 84, जामनेर 68, तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा 41, चाळीसगाव 74, आणि न. पा. भुसावळ येथील केंद्रावर 54 असे एकूण 521 म्हणजेच 74.4 टक्के आरोग्य सेवकांना कोरोनाची लस देण्यात आली. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment