Wednesday, 27 January 2021

परिवहन विभागाचा तालुकानिहाय मासिक दौरा जाहिर

             जळगाव, दि. 27 - जळगाव जिल्हयातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव मार्फत तालुकानिहाय मासिक दौरा आयोजित करण्यात येत आहे.

            माहे फेब्रुवारी, 2021 मध्ये मासिक दौऱ्यात तालुका निहाय बदल करण्यात आलेला आहे. याबाबत नागरिकांनी  नोंद  घ्यावी .

            फेब्रुवारी, 2021 चे मासिक शिबीर कार्यालयाचे वेळापत्रक दौऱ्याचे ठिकाण अमळनेर - पहिला व चौथा सोमवार, जामनेर- दुसरा गुरुवार, पाचोरा- पहिला मंगळवार व तिसरा बुधवार, भुसावळ- पहिला व चौथा गुरुवार, धरणगाव -तिसरा मंगळवार, चाळीसगाव - पहिला, दुसरा व चौथा शुक्रवार, यावल - तिसरा सोमवार, सावदा - पहिला बुधवार, चोपडा - दुसरा सोमवार, रावेर - दुसरा मंगळवार, बोदवड - तिसरा गुरुवार, भडगाव - चौथा मंगळवार, पारोळा - दुसरा बुधवार, मुक्ताईनगर - चौथा बुधवार याप्रमाणे दौरा राहील.

             सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

00000

No comments:

Post a Comment