Friday, 1 January 2021

लोककला आणि पथनाट्य पथक निवड सूचीबाबत आवाहन

  जळगाव, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने लोककला, पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील अनुभवी संस्थेकडून नव्याने निवडसूची तयार करण्यासाठी 1 जानेवारी 2021 पासून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाचा नमुना व माहितीपत्रक www.maharashtra.gov.in तसेच www.dgipr.maharashtra. gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी  व अर्ज नमुनासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव (दूरध्वनी क्रमांक 0257-2229628) येथे  संपर्क साधावा. 

विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक ते कागदपत्रे जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे 1 जानेवारी 2021 ते 21 जानेवारी 2021 पर्यंत सादर करण्यात यावेत. जास्तीत जास्त संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment