जळगाव, दिनांक 23 (जिमाका) : पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवडयांच्या आत निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या निराकरणासाठी मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, जी. पी. ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रती सह दि. 17 जून, 2022 रोजी सकाळी अकरा वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
या
अदालतीत टपाल वस्तु, मनी ऑर्डर,
बचत बॅंक खाते, प्रमाणपत्र या संदर्भातील तक्रारी विचारात
घेतल्या जातील. तक्रारींचा
उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत सहाय्यक निदेशक डाकसेवा (ज. शि.) आणि सचिव डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे
कार्यालय, जी. पी. ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001 येथे दिनांक 31 मे, पर्यंत
पाठवावी, असे
आवाहन मुख्य पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र सर्किल, मुंबई यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये
कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment