Wednesday, 4 May 2022

प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालयाकडे १० जून, २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत

           जळगाव, दि.४ (जिमाका वृत्तसेवा) :  केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षिय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता १३+१ व वेंकटगिरी करीता २ जोगच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांचे मार्फत  विहीत नमून्यात प्रवेश अर्ज १० जून, २०२२ पर्यंत मागविण्यात येत आहेत. त्या नुसार इच्छूक उमेदवारांनी याबाबतचे आपले परिपूर्ण अर्ज दि. १० जून, २०२२ पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग कार्यालय यांचेकडे सादर करावे, प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे  http.www.dirtexmah.gov.in  वर उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमूना  सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे आयुक्त, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, श्रीमती शीतल तेली- उगले, भा.प्र.से. यांनी कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment