जळगाव, दि.५ (जिमाका वृत्तसेवा) : - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते सन २०१९-२०२०, २०२०-२०२१ व २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती अथवा संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांच्याकडे १५ मे, २०२२ पर्यत आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.
अर्जाचा
नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अहमदनगर कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेला
आहे. सदर पुरस्काराची जाहिरात शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
यात
समाजसेवक व्यक्तीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्यमश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार,
संत रविदास पुरस्कार आदी पुरस्कारांचे वाटप करण्यात येणार आहे. संस्थासाठी शाहू,
फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्या
पुरस्कारांचे वाटप करण्यात येणार आहे.
ज्या अर्जदारांनी सन २०१९-२०२० मध्ये अर्ज केला
आहे त्यांनी या कालावधीसाठी पुन्हा अर्ज
करु नये असे सहाय्यक आयुक्त योगेश पाटी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्व्ये कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment