Monday, 2 May 2022

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते समाज कल्याण विभागाच्या योजनांचे उदघाटन

           जळगाव, दि.२ (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र दिन १ मे, २०२२ व कामगार दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे  जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्य हस्ते समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर अभियानाच्या स्टॉलचे उदघाटन करुन समाज कल्याण विभागाच्या योजना मार्गदर्शिका पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी मा  जिल्हाधिकारी  अभिजीत राऊत , पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ. पंकज आशिया,  समाज कल्याण विभागाचे सहाय्यक  आयुक्त योगेश पाटील जळगाव ,  जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग विजय रायसिंग इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

           सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मा. ना. श्री धनजय मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री यांच्या संकल्पनेतुन संपुर्ण महाराष्ट्रभर समाज कल्याण विभागाच्या योजनांचा प्रचार प्रसार व्हावा व तळागळातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना लाभ मिळावा या हेतुने समाज कल्याण विभागाच्य योजनांचा जागर अभियान महाराष्ट्र दिनी सुरु करण्यात आला. यावेळी पालकमंत्रयाच्या हस्ते योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचे उदघाटन करुन ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमात समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रम यशस्वितेसाठी विभागाचे सर्व कर्मचारी, सर्व महामंडळाचे कर्मचारी, तालुका समन्वयक, बार्टी संस्थेचे प्रकल्प अधिकारी व समतादूत यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले  असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००

No comments:

Post a Comment