जळगाव, दि.18 (जिमाका वृत्तसेवा) : - महराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हीजे एनटी) आरक्षण देण्यासाठी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग घटित केला आहे. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित अयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावे यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी, असे आयोगातर्फे निवेदन देण्यात आले आहे.
संबंधित
विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा.
दिनांक 21 मे, 2022 शनिवार विभाग - पुणे वेळ – संकाळी - 9.30 ते 11.30 विभागीय
आयुक्त कार्यालय, पुणे, दिनांक 22 मे,
2022 रविवार विभाग - औरंगाबाद - वेळ – सकाळी - 9.30 ते 11.30 विभागीय आयुक्त
कार्यालय, औरंगाबाद, दिनांक 22 मे, 2022
रविवार विभाग - नाशिक - वेळ सायं -5.30 ते 7.30 विभागीय आयुक्त कार्यालय,
नाशिक, दिनांक 25 मे, 2022 बुधवार विभाग- कोकण
- वेळ दुपारी - 2.30 ते 4.30 विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन, दिनांक 28 मे,
2022 शनिवार विभाग - अमरावती - वेळ सकाळी - 9.30 ते 11.30 विभागीय आयुक्त
कार्यालय, अमरावती, दिनांक 28 मे, 2022
शनिवार विभाग - नागपूर – वेळ - सायं 4.30 ते 6.30 विभागीय आयुक्त कार्यालय,
नागपूर,
असे उपजिल्हाधिकारी (म.प्र.) जिल्हाधिकारी कार्यालय, शुभांगी
भारदे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
००००
No comments:
Post a Comment