जळगाव, दि.6 (जिमाका वृत्तसेवा) : - मा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत तथा अध्यक्ष, कौशल्य विकास जिल्हा कार्यकारी समिती यांनी दि. 5 मे, 2022 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशान्वये जिल्हयातील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत नोंदणीचे प्रतिक्षेत / इच्छुक असणाऱ्या व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांनी स्किल इंडिया पोर्टलवर – TP- Training Provider & TC – Training Centre म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपले (TP-& TC) हे Fully Accrediated – मान्यता & Fully Affiliated – संलग्नता असणे आवश्यक आहे. आपल्या संस्थेस / सेंटरला स्किल इंडिया पोर्टलवर Fully Accrediated – मान्यता & Fully Affiliated – संलग्नता प्राप्त झाल्यानंतर कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हयात विविध कोर्सेसचे प्रशिक्षण उमेदवारांना देता येणे शक्य होईल.
स्किल
इंडिया पोर्टलवर प्रशिक्षण संस्थेची नोंदणी करतांना जिल्हयातील संधीचा विचार करता
विशेषत: Agriculture Food Processing
व Gems & Jewellery या प्रशिक्षण क्षेत्रांचा प्राधान्याने विचार
करण्यात यावा
स्किल
इंडिया पोर्टलवरील नोंदणी व इतर अनुषंगिक माहितीसाठी खालील लिंकचा उपयोग करावा
Link:- https://skillindia.gov.in
कौशल्य
विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभागी होणेसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त
प्रशिक्षण कार्यक्रम राबविणाऱ्या संस्था / सेंटर यांनी स्किल इंडिया पोर्टलवर
नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
स्किल
इंडिया पोर्टलवर नोंदणी करतांना
मार्गदर्शन सहाय्य करणेकामी कार्यालयीन वेळेत महेश चौधरी, जिल्हा कौशल्य विकास
समन्वयक (मोबाईल क्र. 9970837396) जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विदयालय
आवार, जी.एस.ग्राऊंडजवळ जळगाव किंवा कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक -0257-2959790 वर
अथवा शक्य असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कौशल्य
विकास रोजगार व उदयोजकता जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले
आहे.
०००००
No comments:
Post a Comment