जळगाव, दि.6 (जिमाका वृत्तसेवा) : - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य् विभागामार्फत अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीच्या योजना राबविण्यात येतात. दि. 6 मे, 2022 रोजीचे महाडीबीटी डॅशबोर्डचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती योजनांचे अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर मोठया प्रमाणात अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.
तरी
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याव्दारे आवाहन करण्यात येते
की, आपल्या स्तरावरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तपासणी करुन त्वरीत सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण यांचेकडे सादर करावेत, महाविद्यालयीन स्तरावर अर्ज प्रलंबित राहिल्यामुळे
विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्राचार्यांची
राहील, असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment