जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा नियोजन समिती जळगाव व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजना राबविण्यात येत असते. सदर योजने अंतर्गत जिल्हयातील ज्या ग्रामपंचायतीचे व्यायामशाळा बांधकाम पुर्ण झालेले आहे. अशा ग्रामपंचायतीनी व्यायामशाळा साहित्य मागणीचे दोन प्रतीत प्रस्ताव या कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 0000000
No comments:
Post a Comment