जळगाव, दि. 18 - अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्यावतीने देण्यात येणारी शिष्यवृत्तीची
रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून
विद्यार्थ्यांचे अर्ज तातडीने प्राप्त करुन घ्यावे. तसेच समाजकल्याण विभागाने नियमानुसार
आवश्यक ती सर्व कार्यवाही तातडीने पूर्ण करुन विद्यार्थ्यांच्या खात्यावर
शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी. अशा सुचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी
दिल्यात.
जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त
समितीची सभा जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी
कार्यालयात संपन्न झाली. निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, सहायक आयुक्त, समाज
कल्याण खुशाल गायकवाड, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी श्रीमती अनिता राठोड,
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयकर, कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक श्रीमती
अनिसा तडवी, यांचेसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी शासकीय वसतीगृह,
निवासी शाळा, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप, विद्यार्थ्यांची
आरोग्य तपासणी, शिष्यवृत्ती वाटप, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, रमाई आवास
योजना, अनुसूचित जाती उपयोजनांचा आढावा घेतला.
शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, आश्रमशाळेतील 16
हजार 399 विद्यार्थ्यांना आधारकार्डचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसऱ्या सत्रात 30
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. 22 हजार 874
विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज
भरलेले आहे. जिल्ह्यातील 349 महाविद्यालयांना महाडिबीटी पोर्टल अंतर्गत
युजर नेम व पासवर्ड देण्यात आल्याची माहिती श्री. गायकवाड, सहायक आयुक्त,
समाजकल्याण यांनी बैठकीत दिली.
आश्रमशाळेतील ज्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
बाकी आहे. त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने वैद्यकीय
अधिकारी उपलब्ध करुन द्यावेत अशा सुचनाही
जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिल्यात.
000
No comments:
Post a Comment