जळगाव दि. 7 :- जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
सातपुर यांचे संयुक्त विद्यमाने बेरोजगार उमेदारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून
देण्यासाठी 10 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3.00 या वेळेत शासकीय
औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातपुर विभागीय रोजगार व उद्योजकता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्यासाठी
विविध कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी
उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात सिक्युरिटी गार्ड 100 पदे, ट्रेनी पुरुष,आय.टी.आय.
फिटर 100 पदे, सेल्स एक्झीक्युटिव्ह एसएससी, एचएससी,ग्रॅज्युएट 100 पदे, ट्रेनी
एचएससी, इलेक्ट्रिशन, फिटर 75 पदे, ट्रेनी ग्रज्युएट ॲण्ड डिप्लोमा, कॉमर्स
पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट 95 पदे, ट्रेनी पुरुष
एसएससी 20 पदे, ट्रेनी पुरुष एसएससी मोल्डर 15 पदे, ट्रेनी एसएससी आयटीआय,
इंडस्ट्रीयल पेंटर 10 पदे, ट्रेनी पुरुष,आय.टी.आय. फिटर, टर्नर 10 पदे, सीएनसी
ऑपरेटर ॲण्ड मिलिंग ऑफरेटिंग ॲण्ड प्रोग्रामिंग 10 पदे, ऑपरेटर 8 पदे, आयटीआय
इलेक्ट्रीशन, ग्रॅज्युएट इंजिनियर 4 पदे, महिला लाईफ प्लॅनिंग ऑफीसर ग्रॅज्युएट,
सेल रिप्रेजेंन्टीव्ह 40 पदे, एसएससी, फिटर, इलेक्ट्रीशन 25 पदे, डाटाएन्ट्री
ऑपरेटर 20 पदे, असि.मॅनेजर, मेंटनस, ट्रेनि कॉलिटी, फॅब्रिकेशन इंजिनियरींग
प्रत्येकी 1 पद, जिंदाल 10 पदे, युनि डेरीडेन 23 पदे अशी एकुण 708 पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी बायोडेटाच्या पाच प्रती,
छायाचित्र, आधारकार्ड आणि सेवायोजन नोंदणीसह नियोजित वेळी लोहणेर ता.देवळा
जि.नाशिक येथे उपस्थित रहावे. इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी
केली नसल्यास https://rojgar.mahaswayam.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. महारोजगार
वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास सुधारीत पोर्टल व आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक
टाकून लॉगइन करावे आणि आधार व मोबाईल क्रमांक पडताळणी करावी. तसेच पात्रतेनुसार
विविध कंपन्यांच्या रिक्तपदासाठी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी 18602330133 या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच मेळाव्यास
उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपसंचालक सुनिल सैंदाणे, सहाय्यक
संचालक संपत चाटे, व शासकीय आयटीआयचे प्राचार्य एस.एस.कदम यांनी केले आहे.
---
No comments:
Post a Comment