जळगाव,
दि. 20 –उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑन लाइन परिक्षा केंद्राचे उद्घाटन
राज्यपाल तथा कुलपती चे. विद्यासागर राव यांनी आज केले. यावेळी राज्यपाल श्री. राव
यांनी केंद्राच्या परिक्षा कक्षांची पहाणी केली तसेच तेथे उपलब्ध करण्यात आलेल्या
सुविधांची माहिती घेतली. यावेळी विद्यापीठाने ऑनलाइन परिक्षा प्रणालींच्या
माध्यमातून परिक्षा पध्दतींमधील बदलांचा विद्यार्थ्यांसाठी परिणामकारक वापर करावा
अशी भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील, विभागीय
आयुक्त महेश झगडे, प्र. कुलगुरु पी.पी. माहुलीकर, कुलसचिव बी.बी. पाटील,
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, परिक्षा विभागाचे समन्वयक डॉ. समीर नारखेडे,
सिनेट सदस्य दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी
राज्यपाल श्री.राव यांना उद्घाटन झालेल्या परिक्षा केंद्राच्या सुसज्जतेबाबत डॉ.
नारखेडे यांनी माहिती दिली. ऑन लाइन परिक्षा केंद्रामध्ये संगणकांनी सुसज्ज असे
सहा कक्ष असून त्याव्यतिरिक्त सर्व्हर कक्ष स्वतंत्र आहे. या ठिकाणी २३७ संगणक
असून त्यासाठी ४ सर्व्हर यंत्रणा आहेत. विद्यार्थी या प्रणालींचा वापर करुन
केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांच्या तयारी करु शकतील. तसेच
विविध कार्यशाळा, प्रशिक्षण तसेच पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा, प्री-पीएच.डी.
कोर्सवर्क परीक्षा यासाठी देखील या केंद्राचा उपयोग होणार आहे. संगणक
प्रणालींमध्ये या परिक्षांचे सॉफ्टवेअर स्थापीत करण्यात आले आहे.
यानंतर
जैवशास्त्र प्रशाळेचे
संचालक प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी राज्यपालांसमोर विद्यापीठाच्या प्रगतीचे
सादरीकरण केले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.डी.एन.गुजराथी,
विद्यापीठ विविध शाखांचे सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते.
०००००
No comments:
Post a Comment