जळगाव, दि. 22 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन
वसार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) ना. चंद्रकात पाटील हे शनिवार
23 डिसेंबर, 2017 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
शनिवार
23 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता मुंबई विमानतळ येथून एअर डेक्कन एअरवेजच्या
विमानाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 1 वा. 15 मि.नी. जळगाव विमानतळ येथे आगमन व
राखीव. दुपारी 1 वा. 30 मि.नी. उडान (Regional Connectivity Scheme) अंतर्गत जळगाव
- मुंबई विमानसेवेस हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ :-
जळगाव विमानतळ) दुपारी 2 वा. 30 मि.नी. जळगाव विमानतळ येथून विमानाने मुंबई
विमानतळाकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment