Wednesday, 26 September 2018

कुष्ठ रोग शोध अभियान प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर


          जळगाव, दि. 26 :- राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमांतर्गत मा. पंतप्रधान, भारत सरकार यांच्या प्रगती योजनेअंतर्गत कुष्ठरोग शोध अभियान दि. 24 सप्टेंबर 2018 ते 09 ऑक्टोबर 2018 या कालावधीत राबविण्यात येत आहे. कुष्ठरोग कार्यक्रम  हा, शासन जिल्हा परिषद, महानगर पालिका व स्वयंसेवी संस्था यांच्या समन्वयाने राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यातील ग्रामीण भाग व शहरी भागाचे सर्वेक्षण या अभियानात करण्यात येईल. सर्वेक्षणाकरीता  स्त्रियांची तपासणी आशा स्वयंसेविका व पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवक करतील ग्रामीण भागात प्रत्येक दिवशी 20 घरे व शहरी भागात 25 घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हयातील एकुण 43,95,294 पैकी 33,38,290 लोकसंख्येचे सर्वेक्षणाकरीता एकुण 2879, पथके व पर्यवेक्षणासाठी 576 पर्यवेक्षक यांची निवड केलेली आहे. यांच्या मार्फत सर्वांनी व्यवस्तीत सर्वेक्षण करावे व जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण शोधुन उपचाराखाली आणावे. असे कुष्ठरोग शोध अभियान प्रभावीपणे राबवावे अशा सूचना जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अधिका -यांच्या बैठकीत दिल्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर उपस्थित होते.
        श्री. निंबाळकर पुढे म्हणाले की, कुष्ठरोग शोध अभियान 2018-19 मध्ये जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण शोधुन उपचाराखाली आणावे जेणे करुन समाजातील संसर्गजन्य योग्य कुष्ठरुग्णाचे प्रमाण कमी होईल. तसेच मोहिमेमध्ये तपासणीसाठी येणाऱ्या टिम कडुन तपासणी करुन घ्यावी व त्यांना सहकार्य करावे.  आदिवासी भागातील पाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभटृया, ऊसतोड मजुर या भागात कुष्ठरोगाविषयी  स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी यांची मदत घेवुन प्रभावी जनजागृती करावी व या भागातील जनतेची शंभर टक्के तपासणी करण्यात येणार असल्याचे बैठकीत  सहाय्यक संचालक आरोग्‍य सेवा (कुष्ठरोग) डॉ. संजय चव्हाण जळगाव यांनी सांगीतले.
      सर्व कार्यरत टिम (पुरुष / स्त्री) यांनी घरोघरी जावुन पुरुषांनी पुरुषांची व स्त्रीयांनी स्त्रीयांची तपासणी करावी. व संशयीत रुग्णांची नोंद घेवुन तपासणीसाठी प्रा. आ. केंद्र येथे पाठवावे. जेणे करुन रुग्णाचे निदान निश्चित करुन त्वरीत उपचार करण्यात येईल. सर्व शासकीय व निमशासकीय दवाखान्यामध्ये कुष्ठरोग उपचार मोफत दिला जातो. तरी शरीरावरील बधिर चट्टे व लालसर चकाकणारी त्वचा व जाड कानाच्या पाळया, हातापायावरील सुन्नपणा/ बधिरता व शरीरातील विकृती यांची तपासणी करुन सहकार्य करावे असे. जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. बबीता कमलापुरकर यांनी बैठकीत सांगितले.
०००

No comments:

Post a Comment