जळगाव,
दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) - जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव
व सरदार वल्लभभाई पटेल आर्टस ॲन्ड सायन्स महाविद्यालय, ऐनपूर यांच्या संयुक्त विद्यमाने
महाविद्यालयात बुधवार, 12 सप्टेंबर, 2018 रोजी सकाळी 9.30 वाजता लोकराज्य वाचक मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे सप्टेंबर
महिन्यात संपूर्ण राज्यात लोकराज्य वाचक अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग
म्हणून जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये
वाचनाची आवड निर्माण व्हावी. याकरीता विविध महाविद्यालयांमध्ये वाचक मेळाव्याचे आयोजन
करण्यात येत आहे. या मेळाव्याप्रसंगी लोकराज्य मासिकाच्या विविध अंकाचे प्रदर्शन व
स्टॉलही लावण्यात येणार असून या अभियानातंर्गत कार्यालाच्यावतीने जिल्ह्यातील शाळा,
महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दरमहा
लोकराज्य मासिक प्रकाशित केले जाते. सध्या लोकराज्य मासिक हे राज्यातील पहिल्या व देशातील
दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक खपाचे मासिक आहे. या मासिकात शासनाच्या योजनांची माहिती,
विविध विषयांवर आधारित लेख, यशकथा, शासन निर्णय आदिंचा समावेश असतो. वाचक, स्पर्धा
परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व मुलाखतींना सामोरे जाणारे उमेदवार यांच्यासाठी
अत्यंत उपयुक्त माहिती या मासिकात असल्याने केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा
आयोगासह विविध स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी लोकराज्य मासिकाचा संदर्भग्रंथ म्हणून
उपयोग करतात.
या मेळाव्यास रावेरचे तहसीलदार विजयकुमार
ढगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके,
रावेरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे आदि मान्यवर लोकराज्य मासिकाची उपयुक्त्तता,
स्पर्धा परीक्षेच्या तयारीत लोकराज्य चे महत्व, त्याचबरोबर स्पर्धा परिक्षेसाठी अभ्यासाचे
नियोजन, मुलाखत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे.
या मेळाव्यास वाचक, स्पर्धा परिक्षा देणारे
विद्यार्थी, मुलाखतीस सामोरे जाणारे विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,
असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment